एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूककॅन्सरशी झुंज ते पुन्हा नॉर्मल आयुष्य, पन्नाशी ओलांडली तरीही सोनाली बेंद्रेचं प्रेमात पाडणारं सौंदर्य
Actress Sonali Bendre : कॅन्सरशी झुंज ते पुन्हा नॉर्मल आयुष्य, पन्नाशी ओलांडली तरीही सोनाली बेंद्रेचं प्रेमात पाडणारं सौंदर्य
By : जयदीप मेढे | Updated at : 31 May 2025 12:30 PM (IST)
Actress Sonali Bendre
1/8

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. गेल्या काही वर्षात सोनालीच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्यात. तिने कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर मात केली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यात ती पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंडिवर आहे.
2/8

सोनाली बेंद्रे 1990 ते 2000 या संपूर्ण दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय भिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने केवळ अभिनयातच नव्हे तर मॉडेलिंग, टेलिव्हिजन आणि लेखन क्षेत्रातसुद्धा आपली वेगळी छाप पाडली आहे.
3/8

सोनाली बेंद्रे हिचा जन्म 1 जानेवारी 1975 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे वडील जसा कार्पोरेशनमध्ये अधिकारी होते, त्यामुळे तिला अनेकदा स्थलांतर करावं लागत होतं.
4/8

सोनाली बेंद्रे हिने सुरुवातील मॉडेलिंगमधून आपली कारकीर्द सुरू केली. तिच्या सौंदर्यामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तिला लवकरच चित्रपटसृष्टीत संधी मिळाली. 1994 साली 'आग' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'दिलजले', 'सरफरोश', 'हम साथ साथ हैं', 'मेजर साब', 'जख्म' अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तिने काम केले. तिचा अभिनय सहज, नाजूक आणि दिलखुलास असायचा.
5/8

सोनाली बेंद्रे ही तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयासाठी प्रसिद्ध होती. तिचा चेहरा हसतमुख, बोलके डोळे यामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. 'हम साथ साथ हैं' मधील तिची भूमिका विशेष गाजली. तिच्या जोडीला सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार, अजय देवगण यांसारखे मोठे अभिनेते होते.
6/8

चित्रपटांव्यतिरिक्त सोनालीने टीव्हीवरही यशस्वी पदार्पण केले. ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसली, जसे की India’s Best Dramebaaz, India's Got Talent, इ. यामुळे ती घराघरात पोहोचली. याशिवाय, तिने ‘The Modern Gurukul – My Experiments with Parenting’ हे पुस्तक लिहिले असून त्यात तिच्या पालकत्वाच्या अनुभवांचे वर्णन आहे.
7/8

सोनाली बेंद्रे हिने चित्रपट निर्माता गोल्डी बेहल यांच्याशी विवाह केला आहे. त्यांना एक मुलगा आहे. 2018 साली तिला कॅन्सर झाल्याचे समजले.
8/8

तिने अत्यंत धैर्याने या आजाराशी लढा दिला. न्यू यॉर्क येथे उपचार घेत असताना ती तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत राहिली.
Published at : 31 May 2025 12:30 PM (IST)
Tags :
Instagram Sonali Bendre ENTERTAINMENT #Marathi News Actress Sonali Bendre
करमणूक फोटो गॅलरी
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय

अभय पाटील
MI vs GT IPL 2025: गुजरातवर मुंबई भारी
Opinion